रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूर, रायगड आणि इतर जिल्ह्यांमध्ये ईडीने पहाटेच राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. हे सर्व अधिकारी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे.
छत्तीसगडमधील अनेक शहरांमध्ये ईडीने पुन्हा एकदा छापे टाकले आहेत. यावेळी ईडीने राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तसेच व्यावसायिकांच्या घरांवर छापे टाकले आहेत. ज्यामध्ये काही लोक असेही आहेत, ज्यांच्यावर आयटीचे छापे आधीच पडले आहेत. छत्तीसगडमध्ये ईडीने दुर्ग, रायपूर, रायगड आणि महासमुंदसह अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. मुख्यमंत्री बघेल यांचे छत्तीसगडमधील दुर्ग येथील ओएसडी सौम्या चौरसिया, रायगडमधील जिल्हाधिकारी राणू साहू यांचे निवासस्थान, अग्नि चंद्राकर, सूर्यकांत तिवारी, खाण विभागाचे प्रमुख आयएएस जे.पी. मौर्य यांचे रायपूर येथील निवासस्थान, रायगडच्या गांजा चौकातील निवासी प्रिन्स नवनीत, प्रिन्स भाटिया, सीए सुनील अग्रवाल यांचे घरांवर छापे टाकण्यात आलेत.