नवी दिल्ली : भारताने पुन्हा एकदा चीनी अॅप्सवर प्रहार केला आहे. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया आणि व्हीएलसी मीडिया प्लेअरसह अनेक चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
गुगल प्ले-स्टोअर आणि अॅप स्टोअरवर हे अॅप्स यापुढे दिसणार नाही. २०२० ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान एकूण ३२१ अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. बंदी घालण्यात आलेल्या भारतातील सर्वांत मोठ्या अॅप्सबद्दल सरकारने माहिती प्रकाशित केली आहे. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया आणि व्हीएलसी मीडिया प्लेअर हे पब-जीनंतर भारतात वापरले जाणारे सर्वांत लोकप्रिय अॅप आहे. बीजीएमआयवर भारतात स्वतंत्रपणे बंदी घालणश्यात आली आहे.
ऑनलाईन मल्टीप्लेअर बॅटल रॉयल गेमवरील बंदी हा एक मोठा धक्का भारताने चीनला दिला आहे. टेन्सेंट, पबजीवर बंदी घातल्यानंतर क्रॅफ्टॉनने बीएमआय प्रकल्प हाती घेतली. खास भारतासाठी हे गेमिंग अॅप विकसित करण्यात आले होते. भारतीय सरकारची तपासणी या गेमिंग अॅपने उत्तीर्ण केली. परंतु काही दिवसांतच त्यावर बंदी घालण्यात आली आहे.