नवी दिल्ली : योग्य पद्धतीने चार्ज केल्यास बॅटरीचे आयुष्य वाढू शकते. गॅजेट्सना चार्ज करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे गॅजेट्स खराब होऊ शकतात. त्यामुळे उपकरण चार्जरला लावून सोडून देण्याची पद्धत सोडा.
कोणत्याही उपकरणाची बॅटरी २० टक्क्यांवर आल्याशिवाय चार्जिंग सुरू करू नका. बॅटरी ८० टक्के झाल्यानंतर चार्जिंग बंद करा. वापराच्या आधीच उपकरण चार्जिंग केलेले योग्य राहिल. कोणतीही बॅटरी खूप आधी चार्ज करू नका. जितके कमी चार्जिंग केले जाईल तितके बॅटरीचे नुकसान कमी होईल. बॅटरीला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी कधी कधी पूर्ण डिस्चार्ज करणे आणि रिचार्ज करावे लागते, असा एक समज आहे. हा नियम लीड अॅसिड बॅटरीला लागू होतो. हल्ली मोबाइल गॅजेट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीला हा नियम लागू होत नाही. उपकरण २४ तास चार्जिंगला ठेवणे व पूर्ण डिस्चार्ज करणे अयोग्य आहे.