कश्मीर : अभिनेता शाहरुख खान सध्या काश्मीरमध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘डंकी’चे चित्रीकरण करत आहे. या चित्रीकरणाचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात शाहरुख अभिनेत्री तापसी पन्नूसोबत चित्रीकरण करताना दिसतोय. व्हिडिओमध्ये शाहरुखने काळ्या रंगाची पँट आणि लाल जॅकेट घातले आहे. दूरून शूट केलेल्या या व्हिडिओमध्ये तापसी ब्लू डेनिम आणि व्हाइट जॅकेटमध्ये दिसतेय. शूटिंग लोकेशनच्या आजूबाजूला बर्फ आणि काही दुकाने दिसत आहेत.
सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक फोटो समोर आला आहे. यात तो एका चाहत्यासोबत फोटो क्लिक करताना दिसत आहे. या फोटोत किंग खान ब्लॅक जॅकेटमध्ये नेहमीप्रमाणे हॅण्डसम दिसतोय. शाहरुख डंकी चित्रपटाच्या शूटिंगसाठी अलीकडेच काश्मीरमध्ये दाखल झाला होता. त्याचा येथे पोहोचल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता. या व्हिडिओमध्ये किंग खानचे रिसॉर्टमध्ये पुष्पगुच्छ आणि पांढरी शाल देऊन स्वागत करण्यात आले. किंग खानसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानीदेखील दिसली.