मुंबई : बायोटेक, डाटा सायन्स शिकलेल्या तरुणाईला ‘अच्छे दिन’ येणार आहेत. देशातील ६० टक्के नोकरी देणाऱ्या कंपन्या आगामी काळात नव शिक्षितांना (फ्रेशर्स) नोकरी देण्याची शक्यता आहे. देशभरातील करिअर तज्ज्ञांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.
देशभरात मोठ्या प्रमाणावर नव शिक्षितांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते फ्रेशर्सच्या भरतीमध्ये येत्या काही वर्षांतही वाढ होईल. आयटीमध्ये एक लाख नोकऱ्या; अॅनालिटिक्स, ब्लॉकचेनला असेल. आयटी उद्योगाला २०२६ पर्यंत ९५ लाख व्यावसायिकांची गरज असेल. डिजिटल मनुष्यबळ तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, नॅसकॉमने फ्यूचर स्किल्स प्राईम कार्यक्रम सुरू केला आहे.
काही महिन्यांत अॅफिलिएट मार्केटिंग स्पेशालिस्ट, डेटा सायंटिस्ट, मॉलिक्यूलर बायोलॉजिस्ट, वेलनेस स्पेशालिस्ट, युजर एक्सपीरियन्स रिसर्चरसारख्या नोकऱ्या फ्रेशर्सना मिळतील. दुसरीकडे प्रॉडक्ट मॅनेजमेंट, सायबर सुरक्षा, इथिकल हॅकिंग, ब्लॉकचेन, बायोटेक्नॉलॉजी अँड बिझनेस, अॅनालिटिक्स या कौशल्यांना मागणी राहील. एकट्या आयटी क्षेत्रात एक लाख फ्रेशर्सना नोकऱ्या मिळण्याचे संकेत आहेत. ज्यांच्यात क्लाऊड कॉम्प्युटिंग, एआय, बिग डेटा अॅनालिटिक्स ही कौशल्ये असतील. टेलिकॉममध्ये रोबोटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग तज्ञांची गरज असेल.