मुंबई : सलमान खान ईदला त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतो. तर काल त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच याची खूप चर्चा होती. हा चित्रपट पहिल्याच दिवशी चित्रपटगृहात रेकॉर्डब्रेक कामगिरी करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती. पण या चित्रपटाने पहिल्या दिवशी निर्मात्यांचे अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आता समोर आलं आहे.
‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील सलमान खानचा लूक, या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि गाणी या सर्वांना प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत होता. सलमानच्या चाहत्यांनी या चित्रपटाला प्रदर्शनाच्या आधीच अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. तर दुसरीकडे या चित्रपटाच्या गाण्यांमुळे नेटकरी सलमानला ट्रोल करत होते. या चित्रपटाच्या गाण्यांना मिळणाऱ्या नापसंतीचा फटका या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कलेक्शनलाही बसला आहे.